आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची पोलिस आयुक्तांकडे मागणी​​​​​​​:नेते चंद्रकांत खैरे यांचा ट्विटरवर जुना फोटो टाकणाऱ्या नितेश राणेवर गुन्हा दाखल करा

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जूनला सभा झाली. यानंतर काही भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा जुना फोटो व्हायरल केला. हा बदनामीचा प्रकार असून असे कृत्य करणाऱ्यावर सायबर सेलच्या माध्यमातून कारवाई करा अशी मागणी शिवसेनेने पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे आज केली.

पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा ट्विटरवर जुना फोटो टाकणाऱ्या नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा, आणि ट्विटर आणि सोशल मीडियावर असलेल्या वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात केली.

मंदिराच्या मदतीसाठी पैसे दिले-खैरे

सदरील फोटोत दिसणारे गणपत खरात यांचे चार महिन्यापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराच्या भावना दुखावल्या गेल्या. या फोटोमध्ये दिसणारे भाविक असून त्यांना मंदिराच्या बांधकामासाठी हातभार लावल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमासमोर खुलासा केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर गैरकृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी शिवसेनेने केली.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, ऍड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक, आनंद तांदूळवाडीकर,अनिल पोलकर, संतोष जेजुरकर, गणू पांडे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, उपशहर प्रमुख संजय बारवाल, माजी नगरसेवक सचिन खैरे, राजू खरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...