आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:राज्यपालांवर गुन्हा नोंदवा, अन्यथा ठाण्यात आंदोलन

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांबद्दल चुकीचे विधान करणे व समाजभावना भडकवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आम्ही जामीन घेणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या चुकीच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. तसेच त्यांचा फोटो असलेल्या पोस्टरला चप्पलबुटांनी तुडवून संताप व्यक्त करण्यात आला आहे. राज्यपालांना तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा राजभवनावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. याविरोधात मराठा समन्वयकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व समन्वयकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.

त्यामुळे सर्व समन्वयक बुधवारी पोलिस ठाण्यात हजर होणार आहेत. तसेच जोपर्यंत राज्यपालांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्हीदेखील जामीन घेणार नाही. आतमध्ये आंदोलन सुरू करणार आहोत, अशी भूमिका सर्व समन्वयकांनी घेतली आहे, अशी माहिती सुनील कोटकर यांनी दिव्य मराठीला दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...