आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझाडाला बांधून अत्यंत क्रूर पद्धतीने ३२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटनेने सोमवारी शहर हादरले. राज्यभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही गंभीर दखल घेतली. आराेपींवर कठाेर कारवाईसाठी महिनाभरात चार्जशीट दाखल करा, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. राज्यात महिला सुरक्षित नसल्याची टीका करत अशा घटनांमधील आरोपींना शिक्षा देण्यासाठी शक्ती कायदा विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी केली.
चिकलठाणा परिसरात राहुल संजय जाधव (१९), प्रीतम ऊर्फ सोनू महेंद्र नरवडे (२४) आणि रवी रमेश गायकवाड (३४, सर्व रा. बकाल वस्ती, चिकलठाणा) या नराधमांनी महिलेला झाडाला बांधले. त्यानंतर सामूहिक बलात्कार करून हत्या केली. सोमवारी अहवालात बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी हे दुष्कृत्य केले.
तपास अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर केल्या चार प्रमुख सूचना {गोऱ्हे यांनी तपास अधिकाऱ्यांशी चर्चा करत चार प्रमुख सूचना केल्या. { शहराच्या निर्मनुष्य भागात पोलिसांची गस्त वाढवावी. रात्री पथदिवे सुरू आहेत की नाही, याची मनपाने पाहणी करावी. { संवेदनशील, निर्मनुष्य परिसरात पोलिसांचे कायम लक्ष राहावे, म्हणून ठराविक वेळी गस्त घाला. दिवसातून काही वेळा पोलिस आल्याची उद्घोषणा करावी. { पीडितेच्या कुटुंबीयांना मनोधैर्य योजनेतून मदत करण्यासाठी त्वरित प्रस्ताव पाठवून सहकार्य करावे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.