आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

परभणी:आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरूध्द गुन्हा दाखल; जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बेकायदेशीररित्या जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आ.बबनराव लोणीकर यांच्या विरोधात नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आ.लोणीकर यांनी माजी आ.विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, गणेशराव रोकडे, बालाप्रसाद मुंदडा, बाळासाहेब भालेराव आदींसह जिल्हाधिकारी मुगळीकर यांना निवेदन सादर केले होते. त्याद्वारे वारंवार संचारबंदी लागू करू नका, व्यवहार सुरळीत सुरू होवू द्या, अशी मागणी 14 जुलै रोजी केली होती. या अनुषंगाने छायाचित्रे प्रसिध्द झाल्यानंतर नवा मोंढा पोलिसांनी त्या गोष्टीची दखल घेवून गुन्हा दाखल केला.