आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोड:बालिकेचे अश्लील चित्रण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सिल्लोड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहावर्षीय बालिकेचे बाथरूममध्ये अंघोळ करीत असताना मोबाइलमध्ये चोरून अश्लील चित्रण करणाऱ्या युवकास सिल्लोड शहर पोलिसांनी तात्काळ अटक करून त्याच्याविरोधात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नुरानी गल्ली भागातील नुरानी मशिदीशेजारीच राहणाऱ्या मुस्तकीन पठाण (१९) या युवकाने आपल्या शेजारी राहणाऱ्या, बाथरूममध्ये अंघोळ करीत असलेल्या एका बालिकेचे आपल्या मोबाइलमध्ये अश्लील चित्रण केले. ही गोष्ट मुलीच्या काकूच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या आरोपीविरोधात शहर ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी मुस्तकीन पठाणविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...