आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशक्त कलावंत:विद्यापीठातच चित्रपटनिर्मितीचा अभ्यासक्रम सुरू करावा : कदम

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी नाट्यसृष्टीने चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांना अनेक कलावंत दिले. त्यात मराठवाड्यातील सशक्त कलावंतही आहेत. म्हणूनच विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात चित्रपटासंदर्भात अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे, असे मत दिग्दर्शक शिव कदम यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. नाट्यशास्त्र विभागातील एमपीए विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेला ४७ वा एकांकिका महोत्सव ७ जानेवारीपर्यंत आयोजित केला आहे. या वेळी कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डॉ. स्मिता साबळे यांची उपस्थिती होती.

कदम म्हणाले, विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, अभिव्यक्तीला आकाश देणारा विभाग आहे. आता नाटक आणि सिनेमा असा भेद न करता या दोन्ही कलांचा एकत्रित अभ्यासक्रम राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुलगुरूंनी अध्यक्षीय समारोप केला. विभागप्रमुख डॉ. साबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गजानन दांडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. वैशाली बोदेले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक बंडगर यांनी आभार मानले. परीक्षक डॉ. ज्ञानदा कुलकर्णी, डॉ. रामदास ढोके, डॉ. सुनील टाक, प्रा. विशाखा शिरवाडकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...