आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार देण्यासाठी शाळांवर गेल्या दीड-दोन महिन्यांपासून उसनवारीची वेळ आली होती. कारण, पोषण आहारासाठी लागणारी डाळ, तांदूळ, तेल, तिखटमीठही संपले होते. हा शालेय पाेषण आहार शासन स्तरावरून वाटप केला नाही. त्यामुळे लोकसहभागातून मुलांना मध्यान्ह भोजन देण्याची वेळ शाळांवर आेढवली हाेती. अखेर सोमवारी जिल्ह्यातील ७० टक्के शाळांना शालेय पोषण आहाराचे साहित्य वाटप सुरू केले असून, उर्वरित ३० टक्के शाळांना दोन दिवसांत पुरवठा करणार असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ३१६५ शाळांतील ४ लाख ६५,८६२ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जाताे.
पहिली ते पाचवीसाठी प्रति विद्यार्थी १०० ग्रॅम तांदूळ, २० ग्रॅम डाळ, तर सहावी ते आठवीसाठी प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम तांदूळ, ३० ग्रॅम डाळ असे प्रमाण आहे. या आहाराचे पटसंख्येनुसार वाटप केले जाते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात शालेय पोषण आहाराचे साहित्य संपले होते. त्यामुळे शाळांना सुट्या लागण्यासाठी महिनाभराचा अवधी बाकी असल्याने जिल्ह्यातील ३,१६५ शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षकांनी केली हाेती. शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे पोषण योग्य पद्धतीने व्हावे, त्यांनी शाळेत नियमित उपस्थित राहावे, त्यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३,१६५ शाळांतील ४ लाख ६५,८६२ विद्यार्थ्यांना आहार दिला जाताे. कोरोनाकाळात पोषण आहार वाटपात अनेक अडचणी होत्या. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर नियमित पोषण आहार देणे सुरू झाले. त्यात पुन्हा स्वयंपाकी व मदतनिसांचे मानधन थकल्याने पोषण आहार बंद झाला होता. गेल्या दोन महिन्यांत शासन स्तरावर कराराची प्रक्रिया न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शाळांवर उसनवारी करण्याची वेळ आली होती. अजून शाळांना सुट्या लागण्यासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी असल्याने मुख्याध्यापकांनी लोकसहभाग व इतर शाळांची मदत घ्यावी लागली.
तर काही शाळांमध्ये थोडाफार पुरवठा बाकी होता. मात्र, दोन महिने हीच परिस्थिती कायम राहिल्याने शाळा स्तरावर रोष निर्माण झाला होता. त्यावर शाळांनी सुट्या लागेपर्यंतच्या पोषण आहाराची तरतूद करावी, अशी मागणी होत होती. अखेर ३ एप्रिलला शाळांना पोषण आहाराचे साहित्य वाटप सुरू असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. हा शालेय पोषण आहार संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांनी विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे याचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.