आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर विद्यार्थ्यांना दिलासा:महिनाभरात टीईटी परीक्षेचा निकाल लागणार; शिक्षण विभागाची माहिती

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल या गैरप्रकारामुळे कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता ही प्रतिक्षा लवकरच संपणार असून, येत्या महिनाभरात परीक्षा परिषदेकडून जाहिर करण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण
शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण

शिक्षक पदासाठी टीईटी बंधनकारक असल्याने 2013 पासून राज्यात ही परीक्षा घेण्यात येत आहे . कोरोनामुळे 2019 पासून परीक्षेचे नियोजन राज्य परीक्षा परिषदेला करता आलेले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने टीईटी 2021 परिक्षा 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. मात्र या परीक्षेचा निकाल जाहिर करण्याआधीच टीईटी घोटळा उघडकीस आला. त्यातील गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 परीक्षार्थींची नावे राज्याच्या परिक्षा परिषदेने जाहिर केली. ही यादी जाहिर केल्यानंतर आता परीक्षा परिषदेकडून नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या टीईटीचा निकाल लावण्यात येणार आहे. ही परीक्षा प्राथमिक (शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-१) व माध्यमिक स्तरावर (शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-2) ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत पेपर- 1 साठी 13 हजार 199 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते. त्यापैकी 11 हजार 466 परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर पेपर- 2 साठी 9 हजार 705 परीक्षार्थींनी अर्ज भरले होते त्यापैकी 8 हजार 490 परीक्षार्थींनी परीक्षा दिली होती. अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

त्यांची वेतन देयके सादर न करण्याचे आदेश

दरम्यान जे उमेदवार टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या यादीत आहेत. त्यांची वेतन देयके शाळांनी सादर करु नयेत. असे आदेश प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले आहेत.

2020-2021 मध्ये झालेल्या परीक्षांचे निकाल टीईटी मधील घोटाळा समोर आल्यामुळे अद्याप जाहिर करण्यात आलेला नाही. परंतु चौकशी प्रक्रिया आणि पडताळणी सुरु असून, निकालाची प्रक्रिया देखील वेगाने सुरु करण्यात आली आहे. लवकरच येत्या महिनाभरात टीईटीचा निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...