आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर एफआयआर दाखल, गंगापूर साखर कारखान्यात 15 कोटींचा अपहार केल्याचा आरोप

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची फेरफार केल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. आमदार प्रशांत बंब यांच्यासह आणखी 16 जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार केला आहे. कारखान्यातील सभासदांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याची नोंद घेत प्रकरणाचा शोध सुरू केला असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांनी डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. मात्र विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नसल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितले आहे. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर आता प्रशांत बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सभासदांनी म्हटले आहे.