आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:रांजणगावात कापड दुकानाला आग, लाखो रुपयांचे कपडे जाळून खाक

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: संतोष उगले
  • कॉपी लिंक
  • योग्य निर्णय घेतल्याने आग आटोक्यात

औरंगाबादमधील रांजणगाव शेणपुंजी येथील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या जय मल्हार कलेक्शन या कापड दुकानाला आग लागल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. अथक परिश्रम करून तब्बल दोन तासाने आग आटोक्यात आणण्यात एमआयडीसीच्या अग्निशमन दलास यश आले. सदरील आग शॉर्टसर्किटने लागल्याचा तसेच यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कमळापूर रोड चौकात सागर पाटणी यांच्या मालकीच्या बिल्डिंगमध्ये आदेश पांडुरंग कोल्हे यांच्या मालकीचे जय मल्हार नावाने कापड दुकान आहे. तर वरच्या मजल्यावर १० ते १२ खोल्या आहेत. १५ जानेवारी रोजी दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे दुपारी २.३० वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. दरम्यान ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात बंदोबस्तावर असणारे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत हे सुद्धा घटनास्थळी पोहचले. पोलीस व अग्निशमन दलाचे जवान मिळून बंद दुकानाचे बंद शहटर उघडण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे पोलीस निरीक्षक सावंत यांनी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सर्व भाडेकरूंना तात्काळ खाली घेऊन येत मोकळ्या जागेत जाण्यास सांगितले. इकडे मोठ्या परिश्रमाने अखेर शटर उघडण्यात यश आले. त्यानंतर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. मात्र दुकानात प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग असल्याने व इतर खिडकी आदी नसल्याने पाण्याचा मारा करणे अवघड जात होते.

योग्य निर्णय घेतल्याने आग आटोक्यात

अखेर निरीक्षक सावंत यांनी दुकानाच्या मागील बाजूने पाहणी करून मागून भिंत फोडून आग आटोक्यात आणण्याचा निर्णय घेतला. घर मालक पाटणी यांनी तयारी दर्शवली त्यानुसार लोखंडी पाहर आणून भिंतीला छेद करून दोन्ही बाजूने पाण्याचा मारा झाल्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशमनचे जवान व पोलिसांना यश आले. सदरील आगीत किती नुकसान झाले याबाबत सध्याच निश्चित सांगता येणार नसल्याचे दुकान मालकाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...