आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान व इतर साहित्य जळून खाक:वाळूजमध्ये शॉर्टसर्किटने आग; 3 गोदामे भस्मसात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्योगिक परिसरातील सी सेक्टरमधील वेगवेगळ्या तीन गोदामांना लागलेल्या आगीत आतील सामान व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. विशेष म्हणजे सर्वप्रथम ही आग एका ट्रान्सपोर्टच्या गोदामला लागली. ती वेळीच आटोक्यात न आल्याने पुढे शेजारील गोदामात शिरल्याने त्यात लगतच्या दोन गोदामांनी पेट घेतला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

वाळूज औद्योगिक परिसरातील सी-२५२ सेक्टरमध्ये मोहंमद आरिफ हुसेन पटणी (रा.औरंगाबाद) यांच्या मालकीचे स्वस्तिक ट्रान्सपोर्ट आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आग लागल्याचे निदर्शनास आले. मात्र, तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती न देता स्वत:च आग विझविण्याचा प्रयत्न येथील कामगार व व्यावसायिकांनी केला. मात्र, आगीवर नियंत्रण न आल्याने ही आग शेजारील वल्लभ ट्रेडर्स व पार्थ एंटरप्रायझेस या बॅटरीच्या गोदामात शिरली. पुढे अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे अधिकारी पी. के. चौधरी व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोवर त्यात मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती व्यावसायिक पूनम दौलताबादकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...