आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किट:अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या केबिनबाहेर शॉर्टसर्किटमुळे आग ; परिसरात धूर

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या केबिनबाहेरील इलेक्ट्रिक पॅनलला बुधवारी दुपारी ३ वाजता आग लागली कर्मचाऱ्यांनी त्वरित वीजपुरवठा खंडित करत आग विझविली. पहिल्या मजल्यावर असलेल्या नेमाने यांच्या केबिनशेजारी इलेक्ट्रिक पॅनलला अचानक आग लागून परिसरात धूर पसरला. इलेक्ट्रिक केबलही जळू लागली. हे पाहून कर्मचाऱ्यांनी धाव घेत वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर इलेक्ट्रिक पॅनलला लागलेली आग विझविण्यात आली. धूर व केबलच्या उग्र वासामुळे तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काही क्षणातच अग्निशमन दलाची गाडी आली. तोपर्यंत आग विझली होती.

बातम्या आणखी आहेत...