आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भंगार व्यवसाय आणि तेथील जागेच्या वादातून बुढीलेनमध्ये गोळीबार करून एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न झाला. रात्री पावणेबारा वाजता ही धक्कादायक घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार (२५, रा. बुढीलेन) असे जखमी तरुणाचे नाव आहे. दरम्यान, भंगार व्यावसायिक आणि गोळीबार करणारा मित्र दोघेही पसार झाले आहेत.
बुढीलेनमध्ये मनपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक भंगार व्यावसायिकांचे गोडाऊन आहे. तेथील एक व्यावसायिक राजाभाई मेहबूब यांच्या गोडाऊनमागे जब्बारचे घर आहे. त्याच्या घराकडे जाणारा मार्ग राजाभाईच्या गोडाऊनमधून जातो. या रस्त्यावर कायम राजाभाईच्या भंगाराच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. या वेळी राजाभाईचा मित्र अक्रम शेरखानदेखील उपस्थित होता. बाचाबाची वाढताच अक्रमने थेट पिस्तूल काढून जब्बारवर गोळी झाडली. यात पिस्तुलाचा निशाणा हुकला व जब्बारच्या मांडीत गोळी लागली. गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ सुरू झाला. या गोंधळाचा फायदा घेऊन राजाभाई आणि अक्रम दोघेही पसार झाले.
गोळीबार झाल्याचे कळताच उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त विवेक सराफ, निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सिटी चौक चे निरीक्षक संभाजी पवार, बेगमपुर्याचे सचिन सानप सह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तो पर्यंत दोघेही पसार झाले होते. जखमी जब्बारला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या नंतर पावणे बारा परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.