आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड बायपासवरील संग्रामनगर येथील उड्डाणपूल १५ जानेवारीला वाहतुकीसाठी खुला होणार आहे. देवळाई चौकातील पूल २० जानेवारी रोजी तर एमआयटीसमोरील पूल १५ मार्चच्या सुमारास लोकांच्या सेवेत येईल, अशी माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली. औरंगाबाद शहर, सातारा बीड बायपास येथील हजारो नागरिक दोन वर्षांपासून या पुलांच्या प्रतीक्षेत होते. तांत्रिक कारणे पुढे करून ठेकेदार कासवगतीने काम करत होता. नियमानुसार पुलाखालील रस्ताही त्याने वाहतुकीसाठी योग्य बनवला नव्हता.
त्यामुळे लाखो वाहनचालक धूळ आणि खड्ड्यांनी त्रस्त होऊन गेले होते. थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ठेकेदाराने दाद दिली नव्हती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी एका अधिकाऱ्याने पूल पूर्ण करण्यासाठी मार्च २०२३ अशी मुदत असल्याचे सांगितल्यावरही त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. मात्र, आता या पुलांच्या उभारणीसाठी पुढाकार घेणारे आमदार शिरसाट यांनीच पूल कधी खुले होणार याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ते म्हणाले की, पुलांचा उद्घाटन सोहळा करायचा की नाही, याबाबत काही ठरवले नाही. पाहुण्यांच्या वेळा निश्चित करण्यात काही दिवस लागू शकतात. आधी हे पूल लोकांसाठी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.