आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:मराठवाड्यातील पहिले नागरी बेघर निवारा केंद्र हिंगोलीत सुरु, 93.73 लाख रुपये खर्चुन बांधलेल्या इमारतीचे लोकार्पण

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील पहिले नागरी बेघर निवारा केंद्र हिंगोलीत सुरु करण्यात आले असून केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय योजनेच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत ९३.७३ लाख रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या या इमारतीचे गुरुवारी ता. २८ लोकार्पण करण्यात आले आहे. या ठिकाणी बेघर व्यक्तींना निवारा तसेच इतर सोयी सुविधा मिळणार आहेत.

हिंगोली शहरात त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये बसस्थानक, रेल्वेस्थानक या शिवाय सार्वजनीक ठिकाणांचा आसरा घेऊन राहणाऱ्या बेघरांची मोजणी करण्यात आली होती. यामध्ये सुमारे वीस पेक्षा अधिक बेघर नागरीक राहात असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर या नागरीकांसाठी केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्यय योजनेच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत निवारा केंद्र मंजूर करून घेेण्यात आले होते. त्यासाठी ९३.७० लाख रुपयांचा निधी देखील देण्यात आला होता. त्यानुसार हिंगोलीत सुसज्ज इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या ठिकाणी ५० बेघर नागरीकांना राहण्याची क्षमता असून इतर सर्व सोयी येथे दिल्या जाणार आहेत.

या इमारतीचे लोकार्पण आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, नगरसेवक गणेश बांगर, बिरजू यादव, जावेद राज, हमीद प्यारेवाले, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, रवीराज दरक, शाम माळवटकर, प्रिया मोटे, वसंत पुतळे, कपील धुळे, बाळु बांगर, विजय रामेश्‍वरे यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार मुटकुळे यांनी मराठवाड्यातील पहिले निवारा केंद्र हिंगोलीत सुरु केल्याबद्दल पालिकेच्या कामकाजाचे कौतूक केले. या ठिकाणी बेघरांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. सुत्रसंचालन पंडित मस्के यांनी केले तर मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी आभार मानले

१६ बेघरांना लाभ मिळणार ः डॉ. अजय कुरवाडे, पालिका मुख्याधिकारी हिंगोली

हिंगोली पालिकेने मराठवाड्यातील पहिले निवारा केंद्र उभारले आहे. सध्या या ठिकाणी १६ बेघरांना लाभ मिळणार आहे. त्यांच्या निवाऱ्या सोबतच भोजनाची, चहापाण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. त्यासाठी एका संस्थेची नियुक्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकही बेघर शहरातील रस्त्यावर झोपलेला दिसणार नाही.

बातम्या आणखी आहेत...