आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, 8 हजार 739 विद्यार्थ्यांची निवड

औरंगाबाद22 दिवसांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

शहरातील उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीमध्ये ८ हजार ७३९ विद्यार्थ्यांची निवड केली असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक यांनी सांगितले.

राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात येते. यासाठी मागील काही दिवसांपासून २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यात आले होते. याची पहिली यादी रविवारी सायंकाळी जाहीर केली आहे. औरंगाबाद महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ११६ कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमांना ३१ हजार ४६५ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी २३ हजार ४२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ऑनलाईन अर्जाचा पहिला भाग भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ६२० असून, तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३५३ एवढी आहे. तर भाग दोन भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ४५३ एवढीच आहे. यातील ८ हजार ७३९ विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीसाठी करण्यात आली आहे. यात कलाशाखेचे १ हजार ६९१ विद्यार्थी, वाणिज्य शाखा १ हजार ४०७, विज्ञान शाखा ५ हजार ३४० आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमांच्या ३०१ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचेही शिक्षण उपसंचालक देशमुख यांनी सांगितले

0