आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रीडा गुण असलेल्या खेळाडूंनी सर्वप्रथम गोल सेट केले पाहिजे. त्यानंतर लक्ष्य भेदण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत, असा सल्ला ऑलिम्पिकपटू सुमंगला शर्मा यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे बुधवारी त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते.
प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, राजभवन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक माने, सदस्य डॉ. दिनेश पाटील, डॉ. मोहन अमरुळे, निकाल समितीचे शरद बनसोड, विठ्ठलसिंह परिहार, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, डॉ. उदय डोंगरे, डॉ. कल्पना झरीकर, डॉ. फुलचंद सलामपुरे यांची उपस्थिती होती. डॉ. संदीप जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पुरुषोत्तम देशमुख व अमृत बिऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दयानंद कांबळे यांनी आभार मानले.
आम्ही मॅट विकत घेऊ : कुलगुरू डॉ. येवले पुढील काळात होणाऱ्या सर्व प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धा मॅटवरच होतील. अॅथलेटिक्स स्पर्धाही सिंथेटिक ट्रॅकवर घेऊ. विद्यापीठ ‘मॅट’ विकत घेणार असल्याची घोषणा कुलगुरूंनी अध्यक्षीय भाषणात केली. स्पर्धेतील चषक कदाचित जुने होतील, मात्र आठवणी नेहमीच ताज्या असतात. प्रेरणाही देत राहतील, असेही त्यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.