आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पहिले फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलन:25 सप्टेंबरला आयोजन, स्वागताध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळेंनी दिली माहिती

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदच्या वतीने पहिले फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलन रविवारी 25 सप्टेंबर रोजी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत साहित्यक-समीक्षक आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी दिली.

या संमेलनाचे उदघाटन सकाळी साडेनऊ वाजता उदघाटक लक्ष्मण माने यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी रावसाहेब कसबे असतील. यावेळी डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. भारत कदम यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारच्या सत्रात 12 ते 2 यावेळेत "भारतीय संविधान आणि देशाचे विद्यमान पर्यावरण" या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात प्रा. डॉ. श्रीकिशन मोरे, दिव्य मराठीचे पत्रकार डॉ. शेखर मगर, डॉ. सुधीर अनवले, अॅड.विष्णू ढोबळे, डॉ.राजेंद्र गोणारकर यांचा सहभाग असणार आहे.

यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद

2ः30 ते 4ः30 यावेळेत "परिवर्तनवादी जाणिवांच्या साहित्याची भूमिका:शक्तीशाली की डळमळीत" या विषयावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. मारोती कसाब, डॉ. गोविंद बुरसे, डॉ. कीर्तीकुमार मोरे यांचा सहभाग असणार आहे. 4ः30 वाजता या संमेलनाचा समारोप ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

यांची उपस्थिती

यावेळी प्रा. फ.मुं. शिंदे, डॉ. हर्षदीप कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. तर सायंकाळी 6ः15 वाजता प्राचार्य निशिकांत आलटे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. असेही डॉ. कांबळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस डॉ. मोहन सौंदर्य, डॉ. बाळासाहेब लिहिणार, डॉ.युवराज धबडगे, डॉ.बाळासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...