आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसंवाद:पहिले फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलन 25 सप्टेंबरला

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेतर्फे पहिले फुले-शाहू-आंबेडकरी साहित्य संमेलन २५ सप्टेंबर रोजी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत साहित्यिक-समीक्षक आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी दिली.

संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता उद्घाटक लक्ष्मण माने यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी रावसाहेब कसबे असतील. या वेळी डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. भारत कदम यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारच्या सत्रात १२ ते २ या वेळेत “भारतीय संविधान आणि देशाचे विद्यमान पर्यावरण’ या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात प्रा. डॉ. श्रीकिशन मोरे, दिव्य मराठीचे पत्रकार डॉ. शेखर मगर, डॉ. सुधीर अनवले, अॅड. विष्णू ढोबळे, डॉ. राजेंद्र गोणारकर यांचा सहभाग असणार आहे. २.३० ते ४. ३० यावेळेत “परिवर्तनवादी जाणिवांच्या साहित्याची भूमिका : शक्तिशाली की डळमळीत’ या विषयावर ज्येष्ठ समीक्षक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.

बातम्या आणखी आहेत...