आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली कोरोना:हिंगोली जिल्हयातील कोरोना रुग्णाचा पहिला अहवाल निगेटीव्ह

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला

जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधीत रुग्णाचा आयसोलेशनचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पाठविलेला पहिला स्वॅब नमुना निगेटीव्ह आला आहे. याबाबतचा अहवाल बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्यानंतर यंत्रणांनी सुटकेच निःश्‍वास सोडला आहे. आता सध्याच्या स्थितीत हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

हिंगोली जिल्हयात एका रुग्णाला सर्दी, खोकला, तापीची लक्षणे असल्यामुळे त्याला ता. ३१ मार्च रोजी शासकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे स्वॅबनमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी तातडीने नियोजन करून कामाचे स्वरुप स्पष्ट केले होते. त्यानुसार सर्वच यंत्रणांनी त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडली. आरोग्य विभागाने संबंधीत रुग्णांची व्यवस्थीत काळजी घेतल्याने त्याला गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले नाही. त्यानंतर त्याचा आयसोलेशन वॉर्ड मधील चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्याचे ४८ तासाच्या अंतराने स्वॅब नमुने औरंगाबाद येथे पाठविले होते. त्यापैकी पहिला अहवाल बुधवारी ता. १५ सायंकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्याचा पहिला अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यानंतर आता दुसरा अहवाल गुरुवारी ता. १६ प्राप्त होणार आहे. पहिला अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. सध्याच्या स्थितीत हिंगोली जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...