आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निक:पहिली प्रवेश फेरी 30 ऑगस्टपर्यंत सुरू ; प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या फेरीस सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश घ्यायचा नसेल तर त्यांनी जागा स्वीकारताना नॉनफ्रिज बटण क्लिक करावे. तसेच एक हजार रुपये शुल्क भरून दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करावा. त्यामुळे पहिल्या फेरीतील प्रवेशही राखीव राहील, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रवेश समन्वयक डॉ. एच. आर. शेख, डॉ. माधुरी गणोरकर यांनी दिली.

जिल्ह्यातील १३ पॉलिटेक्निक महाविद्यालयांपैकी १२ खासगी तंत्रनिकेतन असून एक शासकीय आहे. शासकीयमध्ये ९ शाखांत ६९० जागा आहेत. पहिल्या फेरीत साडेसातशेहून अधिक विद्यार्थ्यांना ९ विषयांत अलॉटमेंट मिळालेले असून पाचशेपर्यंत प्रवेश निश्चित झाले. कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्सच्या ५० टक्के जागा भरल्या आहेत. प्रवेशाची पहिली फेरी ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून दुसऱ्या फेरीसाठी १ ते ४ सप्टेंबरदरम्यान ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...