आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत सकाळी 11 पासून मिरवणूक:प्रथम ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीची महाआरती नंतर गणेश मंडळांच्या मिरवणुका

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत सकाळी ११ वाजता ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीची महाआरती होईल, त्यानंतर गणेश मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात होईल. राजकीय गटबाजी टाळण्यासाठी पोलिसांनी पाच दिवसांपासून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह, राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांसह बैठका घेऊन वेळा काटेकोर पाळण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

औरंगाबादच्या पाेलिस प्रशासनाकडे ८९० गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले. यात १०३ नामंजूर करण्यात आले होते. काही मंडळांनी चुका दुरुस्त करून पुन्हा अर्ज केला होता. अखेर पोलिसांनी ७८७ मंडळांना अंतिम मंजुरी दिली. शहराला लागून असलेल्या सातारा- देवळाई परिसरात अनेक ठिकाणी मूर्ती संकलन आणि विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. छावणीमध्ये शनिवारी सकाळी मिरवणुकांना सुरुवात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...