आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी रिक्षाची धडक, नंतर कोयत्याने वार:वाळूज परिसरातील धक्कादायक घटना; दुचाकीस्वार गंभीर जखमी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज औद्योगीक परिसरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपुर्वीच खूनाची घटना ताजी असताना आज पुन्हा एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे मार्गावर एका ऑटो चालकाने दुचाकीस्वारावराच्या दुचाकीला धडक देत त्याला खाली पाडून त्याच्यावर धारदार कोयत्याने वार करून जखमी केल्याची खळबळजनक सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली.

पोलिस ठाणे ते पंढरपुर मार्गावर असणाऱ्या धरम काटा समोर पाठीमागून आलेल्या आरोपीने त्याच्या ताब्यातील रिक्षा समोरील दुचाकीस्वार पवन मारोती हाके (27, रा. म्हाडाकॉलनी वाळूज महानगर-1) यास जोरात धडक देवून जखमी केले. तेवढ्यावरच न थांबता खाली पडलेल्या पवनला सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने त्याच्या अंगावर घाव करत जखमी केले.

आरोपी जेरबंद सदरील घटनेनंतर जखमीला तात्काळ घाटी रूग्णालयात रवाना करण्यात आले तर, रिक्षा चालक आरोपी भूषण खैरनार (रा. बजाजनगर) यास ताब्यात घेण्यात आले. पवन हा हॉटेल चालक असून दोघांमध्ये काही दिवसांपुर्वी पासून वाद झाला आहे. त्याच कारणातून त्याने वार केल्याची घटना घडल्याचा प्राथमिक आंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. जखमी आद्याप न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नसावा असे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगीतले.

गुन्हेगारी सर्वाधीक असणारे ‘वडगाव कोल्हाटी’ हे गाव पोलिस आयुक्त यांनी दत्तक घेतले. पुढे याच दत्तक योजनेतील मोफत प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले तरूण-तरूणी पोलिस खात्यात भरती झाले. मात्र, आज स्थितीला पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था मोडीत काढत येथील गुन्हेगारी उफाळून वर येत असताना पोलिस प्रशासन मात्र बघ्याच्या भूमीकेत दिसत असल्यानेच गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. हे थांबणार आहे का? पुर्ववैमन्यस्यातून एका तरूणावर दोघांनी हल्ला चढवत एकाने तलवारीने तर दुसऱ्याने गावठी कट्ट्याने गोळी झाडून जखमी केल्याची घटना कमळापुरात घडली.

बातम्या आणखी आहेत...