आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित्र:मराठवाड्यात प्रथमच अत्याधुनिक गॅस इन्सुलेटेड विद्युत सबस्टेशन

औरंगाबाद / संतोष देशमुख11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह मराठवाड्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक गॅस इन्सुलेटेड विद्युत सबस्टेशन बसवण्यास सुरुवात झाली आहे. पहिले सबस्टेशन शेंद्रा एमआयडीसीत बसवण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने गरजेनुसार त्यांची संख्या वाढवली जाणार आहे. रेग्युलर एआयएस ३३ केव्ही जागेत १३२ केव्हीचे, एआयएस ४०० केव्ही रोहित्रासाठी २०.२५ हेक्टर जागा लागते. जीआयएस रोहित्रासाठी केवळ ४ हेक्टर कमी जागा लागत असल्याने भविष्यात या रोहित्रांची संख्या वाढत जाणार असून विद्युत सेवाही गतिमान होण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

उद्योग, व्यवसाय, शेती, घरगुती आणि पाणीपुरवठा, स्ट्रीट लाइट आदींसाठी विजेची मागणी सतत वाढत चालली आहे. परिणामी २.८५ लाख असलेली शहरातील ग्राहकांची संख्या ३.३६ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. गारखेडा, वाळूज, चिकलठाणा, छावणी, हर्सूल, सिडको आदी रोहित्रावरील विद्युत भार वाढला आहे. ग्राहक संख्येनुसार रोहित्र, उपकेंद्रांचा अभाव आहे. यामुळे वीज वितरण सेवेत तांत्रिक बिघाड होऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. देखभाल-दुरुस्तीसाठी वीज सेवा चार ते आठ तासांपर्यंत बंद ठेवली जाते. यामुळे ग्राहक संताप व्यक्त करतात.त्यावर उपाय म्हणून अत्याधुनिक गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन आले आहेत. त्याला पूर्वीच्या स्टेशनच्या तुलनेत कमी जागा लागते.

हे होणार आहेत फायदे : परंपरागत एआयएस सबस्टेशनचे स्ट्रक्चर ब्रेकर, आयसुलेटर, पीटी, सीटी ही उपकरणे वेगवेगळे बसवली जात होती. यासाठी प्रत्येकाला १० बाय १०, ५ बाय ५ मीटरची जागा लागते. नव्या जीआयएस सबस्टेशनच्या एकाच मॉडेलमध्ये सर्व उपकरणे बसवली आहेत. यात उपकरणे जळणे, बिघडण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे विद्युत सेवाही दर्जेदार होईल. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार वीजपुरवठा खंडित करावा लागणार नाही. जागेचा प्रश्न सुटेल. मनुष्यबळही ५० टक्के कमी लागेल. ग्रीस, ऑइल लागणार नाही. दीर्घकालीन खर्चात बचत होईल. विद्युत सेवा अखंडित व गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे महापारेषणचे अधीक्षक अभियंता रंगनाथ चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...