आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:औरंगाबादेत डॉक्टर दाम्पत्याचा घरातून चोरांनी केली हिरे, सोन्याची लयलूट, साडे पाच लाखांचे हिरे,१७ ग्रॅमचा नेकलेस लंपास

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

शहरातील एन-३ मधील डॉक्टर दांपत्याच्या घराचे ना कुलूप तुटले, ना मौल्यवान वस्तू ठेवलेल्या खोलीतील साहित्याची हालचाल झाली. मात्र, तरीही त्यांच्या खोलीतील साडेपाच लाखांचे हिरे व १७ ग्रॅम सोन्याचा नेकलेस चोरीला गेला. हा प्रकार कुटुंब सहलीवरून परत आल्यानंतर उघडकीस आला. याप्रकरणी डॉ. शहाब अन्सारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या नोकरांवर संशय व्यक्त केला जात आहे. शहाब अन्सारी नसिरोद्दीन अन्सारी (४३) दोन मुली, डॉक्टर पत्नीसह गेल्या ६ वर्षांपासून एन-३ मधील वाय. एम. शिंदे यांच्या बंगल्यात भाडेतत्त्वावर राहतात. शहरात मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून उर्वरित इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेले शहाब युरोप खंडातील विविध देशांच्या लष्कराला वैद्यकीय सेवा पुरवतात. त्यानिमित्त ते सहा आठवडे परदेशात, तर सहा आठवडे औरंगाबादेत वास्तव्यास असतात. पत्नी तन्वीर मनपा वैद्यकीय अधिकारी आहेत. सर्व कुटुंब ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानात फिरण्यासाठी गेले होते.

यादरम्यान पत्नीने सोन्याचे दागिने ठेवून बेडरूम लॉक केली होती. मात्र, त्यांनी ८ मार्च रोजी ती दागिन्यांची पिशवी उघडून पाहिली असता त्यात ४ तोळे वजनाचे हिऱ्याचे दागिने व १७ ग्रॅमचा नेकलेस आढळून आला नाही. हा प्रकार पाहून डॉक्टर दांपत्याला धक्काच बसला. घरात कोणीही न येता, तोडफोड न होता दागिने लंपास झाल्याने त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांत धाव घेतली. या डॉक्टर दांपत्याच्या घरात ८ महिन्यांपासून झाडू, फरशी, कपड्यांना इस्त्रीसाठी एक, दुसरी महिला एक महिन्यापासून, तर स्वयंपाकासाठी २० दिवसांपासून एक महिला काम करते. त्यांनी पोलिसांत दिलेल्या जवाबात या नोकरांवर संशय व्यक्त केला आहे.

दोन इन्व्हर्टरची चोरी : दुसऱ्या घटनेत आयडीएफसी फर्स्ट भारतच्या एन-८ शाखेत चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे वाकवून चोरी केली. १० मार्च रोजी कर्मचारी नेहमीप्रमाणे कार्यालय उघडण्यासाठी गेले असता लॉक तुटलेले दिसले, तर प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही वाकवलेला होता. चोरांनी प्रवेश करून जिन्याजवळ ठेवलेले दोन इन्व्हर्टर चोरून नेले. याप्रकरणी सिडको पोलिस तपास करीत आहेत.

कपड्याची ट्रॉली, बॅग, मनगटी घड्याळ लांबवले : तिसऱ्या घटनेत गारखेड्यातील गजानन कॉलनीतील खासगी कंपनीतील अभियंता विपुल आनंद तिवारी ९ मार्च रोजी रात्री कंपनीत गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. या वेळी चोरट्यांनी सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. मात्र, मौल्यवान वस्तू भेटली नाही म्हणून लॅपटॉप, मनगटी घड्याळासह कपड्याची ट्रॉली, बॅग चोरून नेली.

बातम्या आणखी आहेत...