आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:एक जण बुडताच वाचवायला गेलेले 5 जण बुडून मृत्युमुखी, भालगावमधील तीन सख्ख्या भावांचा मृत्यू

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तलावात अंघोळीसाठी उतरलेल्या 5 तरुणांचा बुडून मृत्यू

तलावात अंघोळीसाठी उतरलेल्या ५ तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता शेंद्रा एमआयडीसीतील डोंगरपायथ्याशी असलेल्या नाथनगर शिवारात घडली. मृतांत तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

उद्याची बकरी ईद साजरी करण्यासाठी घरात चार पैसे हवेत म्हणून ही मुले शेतात कामाला गेली होती. कामानंतर ते दुपारी घरी परत निघाले. जवळच्या तलावात ते अंघोळीसाठी उतरले. मात्र त्यांना खोलीचा अंदाज आला नाही. तलावात उतरताच दोघे बुडायला लागले. त्यांना वाचवण्यासाठी इतर तिघे उतरले असता पाचही जण पाण्यात बुडाले. यात समीर शेख मुबारक शेख (१७), शेख अन्सार शेख सत्तार (१७) या दोघांसह आतिक युसूफ शेख (१८), तालेब युसूफ शेख (२१) व सोहेल युसूफ शेख (१६) या तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. शेख समीर व शेख अन्सार हेे जण याच वर्षी बारावीत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले होते. सोहेल युसूफही दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. आतिकचेही महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. या घटनेने भालगाव व पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.