आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:मराठवाड्यात पाच अपघातांत पाच जागीच ठार, 11 जखमी ; बीड अन् हिंगोली जिल्ह्यांतील व्यक्ती

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड घाटात ब्रेक फेल झाल्याने तीन ट्रक एकमेकांवर आदळले. घाटातील वाहतूक ३० तासांनी सुरळीत सुरू झाली. वैजापूर शहरात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार व एक जण जखमी झाला, तर गंगापूर रस्त्यावर कंटेनरने युवकास चिरडले. बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील दाेघे गावाकडे परतत असताना परभणी जवळील ब्रह्मपूर येथे चालकाचा कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात दाेघे ठार तर अन्य पाच जण जखमी झाले. हिंगोली जिल्ह्यात भरधाव कार उलटून एकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच पाच जण जखमी झाले आहेत.

धुळे-साेलापूर महामार्गावर शुक्रवारी सकाळी एकाच दिवशी दाेन अपघात झाले. कन्नड घाटात पहाटे चार वाजता ब्रेक फेल झाल्याने तीन ट्रक एकमेकांवर आदळले. कन्नड घाटातील वाहतूक ३० तासांनी सुरळीत सुरू झाली. दुसरा अपघात मेहुणबारेच्या पुढे तरवाडेबारीजवळ सकाळी ९ वाजता झाला. येथेही दाेन ट्रक समाेरासमाेर धडकले. एकाच दिवशी दाेन अपघात झाल्याने पोलिसांना धावाधाव करावी लागली. महामार्गावर चाळीसगाव कन्नड घाट परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असल्याने महामार्ग धाेकेदायक झाल्याची भावना वाहनधारकांमधून व्यक्त हाेत आहे.

उमरा फाटा ते पांगरा शिंदे मार्गावर कार उलटली कळमनुरी तालुक्यातील उमरा फाटा ते पांगरा शिंदे मार्गावर सिंदगी शिवारात भरधाव कार उलटून त्याखाली दबल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. पाच जण जखमी झाले. गुरुवारी रात्री हा आपघात झाला. चाँदखाँ मेहबूबखाँ पठाण असे मृताचे नाव आहे. हिंगोली तालुक्यातील माळेगाव येथील चाँदखाँ पठाण हे पत्नीच्या उपचारासाठी कारने नांदेडला नातेवाइकांसह गेले होते. ते रात्री हिंगोलीकडे निघाले. दरम्यान, त्यांचे वाहन पांगरा शिंदे ते उमरा फाटा मार्गावर सिंदगी शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यात कार रस्त्याच्या खाली गेली. यात चाँदखाँ बाहेर फेकले गेले, तर त्यांच्या अंगावर कार उलटली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेहानाबी पठाण, रेश्मा शेख, सय्यद पाशा, हसीनाबी शेख व चालक जखमी झाले.

ब्रह्मपूर येथे चालकाचा कारवरील ताबा सुटला धारूर तालुक्यातील उमरेवाडी येथील बचाटे कुटुंबातील एका व्यक्तीला दारूचे व्यसन जडल्याने दारू सोडवण्यासाठीचे इंजेक्शन देण्यासाठी खासगी कार करून परभणी जिल्ह्यातील लोहगाव येथे गेले होते. इंजेक्शन घेऊन ८ सप्टेंबर राेजी धारूर तालुक्यातील उमरेवाडीकडे परतत असताना ब्रह्मपूर जवळ रस्त्यावरील बंधारा न दिसल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटून कार उलटून अपघात झाला. अशोक अर्जुन बचाटे, जयश्री सचिन बचाटे (दाेघे रा. उमरेवाडी) हे जागीच ठार झाले. सचिन भास्कर बचाटे, भास्कर रामभाऊ बचाटे, दिनकर बालासाहेब बचाटे (सर्व रा. उमरेवाडी, ता. धारूर), दादासाहेब भोसले (रा. शिंगणवाडी, ता. धारूर) व चालक जखमी झाले.

वैजापूर शहरात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी माल वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिली. यात प्रतिभा राजेंद्र चौधरी (४०) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सासरे गंभीर जखमी झाले. शनिवारी दुपारी शहरातील वैजापूर-गंगापूर रस्त्यावर मनमोहन अॅग्राेजवळ वीस वर्षीय युवकाचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू झाला. शहरातील प्रतिभा चौधरी या सासऱ्यांसोबत दुचाकीने (एमएच २० आयडी ८३१२) येवला रस्त्याने भाजी मंडईत निघाल्या होत्या. याचवेळी भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रक जोरात येत असताना मोटरसायकल बाजूला घ्यायला जागा न मिळाल्यामुळे या अपघातात प्रतिभा चौधरी चिरडल्या गेल्याने त्या जागीच ठार झाल्या तर त्यांचे सासरे गंभीर जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...