आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील काेराेना लसीचा साठा संपलेला आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातून पावणेपाच लाख लसींची मागणी करण्यात आली हाेती. मात्र, अजूनही लस मिळाली नाही. आणखी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या महिन्यात ३,९१४ लोकांनी लस घेतली.
नोव्हेंबरमध्ये २,३६८ तर ऑक्टोबरमध्ये १,७३७४, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात ६१ जणांनी लस घेतली. प्रशासनाकडून लसीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, राज्यभरात कुठेही लस उपलब्ध नसल्यामुळे अडचण होत आहे.
८५% लाेकांनी घेतली लस
जिल्ह्यात ३५ लाख ७६ हजार ७३८ लोकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पहिला डोस ३० लाख ५६ हजार ९६३ जणांनी (८५ टक्के) घेतला. दुसरा डोस २४ लाख २७४८ जणांनी (६७ टक्के) घेतला. सध्या जिल्हा प्रशासनाने कोविशील्डचे एक लाख, कोव्हॅक्सिनचे साडेतीन लाख तर कोर्बेव्हॅक्सचे २५ हजार डाेस मागवले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.