आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवू मृत्यू:शेततळ्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, पैठण तालुक्यातील दुर्दैवी घटना

पैठण3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालुक्यात दोन दिवसात 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे एका शेततळ्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विहामांडवा पासून तीन कीमी अंतर ही कोरडे वस्ती वरील घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पैठण तालुक्यात मागील दोन दिवसात 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

सध्या उन्हामुळे सर्वजण त्रस्त झाले आहे. दिवस जसाजसा चढत जात आहे, तसातसा उन्हाची तीव्रताही वाढत आहे. या उन्हाच्या तीव्रतेत थोडा थंडावा मिळवण्यासाठी पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील कोरडे कुटुंबीय आज दुपारी 3 च्या सुमारास आपल्या शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होतो. यादरम्यान एकाच कुटुंबातील पाच जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लक्ष्मण निवृत्ती कोरडे, वैभव रामनाथ कोरडे, सार्थक लक्ष्मण कोरडे समर्थ ज्ञानदेव कोरडे आणि अलंकार रामनाथ कोरडे असे पाच जण आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

पाचोड परिसरात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू

पैठण तालुक्यातील पाचोड जवळील  दावरवाडी येथे शनिवार रोजी (ता.11) दुपारी एक वाजेच्या सुमारास दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. प्रकाश देशमुख यांच्या शेतातील त्यांच्या शेततळ्यावर पाणी पाहण्यासाठी त्यांचा नातू यश विनोद शिंदे (8) व लॉकडाऊनमध्ये मामाच्या गावी आलेला पुरुषोत्तम संतोष जाधव (20, रा. नागेश्वरवाडी, औरंगाबाद)हे गेले होते. दोघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब नातेवाइकांना कळताच त्यांनी शेततळ्यातून त्यांना बाहेर काढून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन यांनी तपासून मृत घोषित केले. 

विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय महिलेसह तीन वर्षीय चिमुकलीचा पाय घसरून विहीरत पडून मृत्यू झाल्याची घटना (दि.11) रोजी देवगाव येथे अकराच्या सुमारास घडली आहे. कोमल संतोष बोरूळे वय तीस वर्ष व तिची तीन वर्षांची चिमुकली दिया संतोष बोरूळे घेऊन ती देवगाव शिवारातील गट नंबर 20 मधील विहिरी वर कपडे धुण्यासाठी गेले असता चिमुकली दिया बोरुळे ही खेळता-खेळता विहीरीच्या कडेवर केली. परंतु विहीरीला कडे नसल्यामुळे दियाचा पाय घसरून पाण्यामध्ये पडले असता तिच्या आईने तिला वाचवण्यासाठी तत्काळ धाव घेतली. परंतु कोमल यांनाही पोहता येत नसल्यामुळे कोमलचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...