आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:पाच मोर मृतावस्थेत आढळले ,शिरूर तालुक्यातील लोणी शिवारातील प्रकार

शिरूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नमुणे तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले

जिल्ह्यात "बर्ड फ्लू'चे सावट असताना तालुक्यातील लोणी शिवारात शुक्रवारी पाच मोर मृतावस्थेत आढळुन आले असुन माहिती मिळताच वन विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन मोरांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठवले. अहवाल आल्यावर मोरांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील लोणी येथील तलावा जवळील दादाबा महानोर आणि अंबादास केदार यांच्या माळसोंड नावाच्या शेतात शुक्रवारी पाच मोर मृतावस्थेत असल्याचे येथील रहीवासी प्रा. भास्कर बडे यांना दिसले. त्यांनी यााची माहिती वन कर्मचारी शिवाजी आघाव यांना दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी ,पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन माहिती घेतली. तेंव्हा मृत मोरात तीन नर व दोन लांडोर मादीचा समावेश आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी मृत मोराचे नमुने गोळा केले असुन ते तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर मोरांचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाला आहे की विषबाधेने हे स्पष्ट होणार आहे.

वनविभागाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.घटनास्थळी वनरक्षक बद्रीनाथ परजने, प्राणी मित्र सिद्धार्थ सोनवणे, वन कर्मचारी शिवाजी आघाव, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव, पशुधन पर्यवेक्षक सोपान रानडे यांनी भेट दिली आहे.

सतर्क राहण्याचे आदेश दिले

तालुक्यात मागील आठ - दहा दिवसांपासून पक्ष्यांचे मृत्यू होत असुन आता पर्यंत तीस पक्षी मृत झालेत. त्यात २१ कावळे, तीन चिमण्या, 5 मोर, आणि एका होल्याचा समावेश आहे. पाडळीच्या एका कावळ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या भागात लक्ष ठेवुन असुन तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.-डॉ. प्रदीप आघाव, पशुधन विकास अधिकारी, शिरूरकासार.

रिपोर्ट आल्यावरच मृत्यू कशामुळे ते सिध्द होईल

आज पाच मोरांचा मृत्यू नेमका बर्ड फ्लू मुळे झाला आहे की, त्यांची शिकार झाली आहे. हे स्पष्ट झालेलं नाही. या मोरांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच त्या मोरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.- सिद्धार्थ सोनवणे ,वन्यजीव अभ्यासक,शिरूर