आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथीचा उद्रेक:शहरात गोवरचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण ; हाफकिन प्रयोगशाळेतून 62 बालकांचे अहवाल प्राप्त

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गोवर साथीचा उद्रेक वाढत आहे. १२ डिसेंबर रोजी पाच बालके गोवरची पॉझिटिव्ह निघाली, तर ८ संशयित आढळली. संशयित बालकांचा आकडा १६८ वर पोहाेचला आहे. पॉझिटिव्हची संख्या २२ झाली आहे.मुंबईच्या हाफकिन प्रयोगशाळेतून गोवर साथीच्या ६२ बालकांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २२ जण पॉझिटिव्ह आढळले. सोमवारी आठ बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उशिराने अहवाल मिळत असल्यामुळे बालकांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. मनपाच्या आरोग्य विभागामार्फत प्रत्येक आरोग्य केंद्रात ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकाचे लसीकरण केले जात आहे. सोमवारी ५५ बालकांना अतिरिक्त डोस देण्यात आला. तसेच एमआर-१चे २० आणि एमआर-२ चे १९ बालकांना डोस दिला.

बातम्या आणखी आहेत...