आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक नुकसान:32,000 मुलांसाठी जिल्ह्यात पाच हजार माता-पालक गट ; विद्यार्थ्यांचा समावेश

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आईने देखील पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी शाळांमध्ये माता-पालक गट स्थापन केले. निपुण भारत प्रकल्पांतर्गत बालवर्ग ते तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम हाती घेतला. त्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील ३२,२०० मुलांसाठी ५०१७ माता गट तयार केले आहेत.

पाच-सहा महिलांच्या या गटात एक (लीडर) ‘स्मार्ट माता’ राहणार असून तिच्या माध्यमातून गटाचे समन्वय केले जाणार आहे. संस्थेच्या मदतीने सरकारने या गटातील मातांना प्रशिक्षण, मुलांना शिकवण्यासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या अभियानात माता गटांना सहभागी करून घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने ऑक्टोंबरमध्ये घेतला होता. त्यानुसार या अभियानाची अंमलबजावणी हाेत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

माता-पालक गट स्थापन करण्याच्या सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत. त्यानुसार गटदेखील स्थापन केले आहेत. याचा मुख्य उद्देश बालवर्ग ते तिसरीच्या वर्गातील मुलांच्या शैक्षणिक विकासात त्यांच्या पालकांचाही सहभाग असावा, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सांगितले.

माता गटाचा होतो फायदा शाळांनी आम्हा माता-पालकांचा गट तयार केला. त्यामुळे चांगला फायदा होतोय. मी या गटाची प्रमुख आहे. शाळेकडून व्हिडिओ येतो. मग आम्ही सर्व गटातील महिला एकत्र येऊन तो पाहतो आणि मुलांना कृती करण्यास सांगताे. -ज्योती राजलवार, माता पालक गट प्रमुख सातारा

बातम्या आणखी आहेत...