आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हान:पाच विद्यापीठे करणार दुष्काळी भागांमधील जलस्रोतांचे संवर्धन ; पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचे उद्दिष्ट

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलसंवर्धन व पाणी बचत अभियानात सक्रिय सहभाग घेण्यासाठी राज्यातील ५ विद्यापीठांची महाराष्ट्र शासनाने निवड केली आहे. युनिसेफ आणि राज्याच्या उच्च शिक्षण विभागामध्ये त्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. पाणी बचत, नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याचे काम आता या पाच विद्यापीठांतील विद्यार्थी करणार आहेत.

उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत त्यावर उपाययोजना करण्याचे राज्य सरकारने सुनिश्चित केले आहे. त्यासाठी युनिसेफ आणि उच्च शिक्षण विभागाने ३० नोव्हेंबरपूर्वीच सामंजस्य करार केला आहे. मराठवाडा प्रदेश दुष्काळसदृश असतो. त्यामुळे मराठवाड्यातील दोन्ही अकृषी विद्यापीठांची निवड केली आहे. यात औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठ, पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कोल्हापूरच्या शिवाजी महाराज विद्यापीठाचीही निवड केली आहे.

पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद, उस्मानाबाद पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, पालघर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, जालना, अहमदनगर, सातारा आणि बीड जिल्हे दुष्काळसदृश असल्याचे सरकारचे निरीक्षण आहे. त्यामुळे या भागातील विद्यापीठांत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील रासेयोचे स्वयंसेवक जलस्रोतांचे संवर्धन करणार आहेत. शिवाय गावे आणि शहरांत जाऊन लोकांना पाणी बचतीचे महत्त्व सांगणार आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांची नोडल ऑफिसर म्हणून निवड झाली. युनिसेफने युसूफ कबीर यांना नोडल ऑफिसर केले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले सल्लागार समितीचे सदस्य असतील.

४ पैकी ३ जिल्ह्यांत रासेयोचे स्वयंसेवक काम करतील युनिसेफच्या सहकार्याने या संकल्पासाठी विद्यापीठाची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीन जिल्ह्यांत रासेयोचे कार्यक्रमाधिकारी, स्वयंसेवक-विद्यार्थी जलसंवर्धन आणि पाणी बचतीचे महत्त्व समजावून सांगतील. त्यात बीड, औरंगाबाद, जालन्याचा समावेश असेल. -डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

जानेवारीत कृती आराखडा निश्चित होण्याची शक्यता राज्यात ५२ मोठ्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आहेत. पैकी फक्त ५ विद्यापीठांची निवड झाली. मुंबई, पुणे आणि औरंगाबादेत सर्वाधिक रासेयोचे स्वयंसेवक आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर पुढील महिन्यात बैठक होईल. त्या वेळी कृती आराखडा निश्चित होण्याची शक्यता आहे. -डॉ. प्रशांतकुमार वनंजे, राज्य संपर्क अधिकारी, रासेयो

बातम्या आणखी आहेत...