आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भोकर तालुक्यातील मौजे दिवशी (बु.) येथे पाचवर्षीय चिमुकलीवर ३५ वर्षीय नराधमाने अत्याचार करत तिचा निर्दयीपणे खून केला. ही घटना बुधवारी (ता.२०) घडली. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, पोक्सो कायद्यांतर्गत भोकर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (ता.२१) आरोपीला भोकर न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारीलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दिवशी (बुद्रुक) येथील आरोपी बाबुराव उकंडू सांगेराव या नराधमाने बुधवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान पाचवर्षीय बालिकेला आपल्यासोबत एका नदीच्या परिसरात नेले व तिच्यावर अत्याचार केला. तिच्या अंगावर नको त्या ठिकाणी चावा घेऊन लचके तोडले. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिचे हातपाय मुरगळून मोडून टाकले व तिचा खून करून मृतदेह गावातील नदीत फेकून दिला. इकडे चिमुकलीचे नातेवाईक तिचा शोध घेत होते. परंतु सायंकाळपर्यंत शोध घेऊनही ती सापडत नव्हती. दरम्यान, नागरिकांनी गावाजवळील नदीत शोधाशोध केली असता बालिका मृतावस्थेत आढळून आली.
जमावाने आरोपीला फरपटत आणले
मृतदेहापासून काही अंतरावरच नराधम आरोपी हा गवतात दडून बसल्याचे दिसून आल्याने त्याला बेदम चोप देत जमावाने रस्त्यावर फरपटत आणले. तेवढ्यात पोलिसांचा फौजफाटा तिथे पोहाेचला. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या वेळी जमाव आक्रमक झाला होता. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.
आराेपीने पत्नीस केली हाेती मारहाण
आरोपी बाबूराव हा विकृत बुद्धीचा असून त्याने सात वर्षांपूर्वी आपल्या पत्नीला घरात कोंडून बेदम मारहाण करीत असताना काही लोकांनी त्याच्या पत्नीस त्याच्या तावडीतून सोडवले होते. अन्यथा त्याने तिचा खून केला असता तेव्हापासून पत्नी एका मुला, मुलीसह माहेरी सावळी गावी राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.