आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थिव ताब्यात:आईच्या निधनानंतर पाच वर्षांनी पाहिला थेट वडिलांचा मृतदेह ; खुनातील वृद्धाची ओळख पटली

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारंवार समजावून सांगूनही वडील घरी राहत नव्हते. दहा वर्षांपूर्वी त्यांनी घर सोडले. पाच वर्षांपूर्वी आईचे निधन झाले तेव्हा शेवटचे आम्ही वडिलांना पाहिले होते. त्यानंतर आज त्यांचा खून झाल्याचे कळले, अशी माहिती सोमवारी घाटी परिसरात खून झालेल्या वृद्धाच्या मुलाने दिली. बेगमपुरा पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच्या एका तपासाच्या फाइलवरून वृद्धाची ओळख पटवत सोमवारी मध्यरात्री त्याचे घर शोधले. संगराव व्यंकट जाधव-देशमुख (६८) असे त्यांचे नाव आहे. मंगळवारी शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मुलाच्या ताब्यात दिले. किरकोळ वादावरून एका नखेशेखोराने घाटी परिसरात रविवारी मध्यरात्री दोघांचा खून केला हाेता. प्राथमिक माहितीत मृतांमध्ये नागेश्वर शिवलिंगअप्पा घुसे (५०, रा. कोहिनूर कॉलनी, मोगलपुरा) आणि संग्राम रंकट (७०) अशी नावे समोर आली होती. नागेश्वर यांच्या डोक्यात दगड तर रंकट यांचा गळा आवळून शेख वजीर शेख बशीर (३२, रा. कोहिनूर कॉलनी) याने खून केला हाेता. रंकट म्हणून नाव समोर आलेले वृद्ध फुटपाथवर झोपडी टाकून एकटेच राहत होते. त्यांच्याजवळील घाटीतील उपचारांच्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली.

छायाचित्र दाखवून िचकलठाण्यात घेतला शाेध : निरीक्षक प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक विशाल बोडखे, हेड कॉन्स्टेबल काकडे यांनी घाटी परिसरात रंकट यांच्याविषयी माहिती घेतली. मात्र, कुणालाही त्याची कल्पना नव्हती. यादरम्यान दोन वर्षांपूर्वी एका तपासाच्या प्रकरणात काकडे यांचा रंकट यांच्याशी संपर्क झाला होता. त्या वेळी त्यांची माहिती त्यांनी घेतल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाण्यातील दोन वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड तपासले असता त्यांच्या घराचा पत्ता चिकलठाण्यात असल्याचे समोर आले. त्यावरून बोडखे, काकडे तत्काळ चिकलठाण्याकडे रवाना झाले. परिसरात छायाचित्र दाखवून शोध घेत पोलिस त्यांचा मुलगा रंगराव जाधव (४३) यांच्या घरी पोहाेचले व त्यांचे नाव संगराव जाधव असल्याचे स्पष्ट झाले. रंगराव यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे वडील दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हते. ते कुणालाही न सांगता निघून जात. त्यांच्या मुलांनी अनेकदा त्यांना घरी नेले. परंतु ते राहत नव्हते. पाच वर्षांपूर्वी आईचे निधन झाले. त्या वेळी आम्ही वडिलांना शेवटचे बघितले व त्यानंतर आज त्यांचा खूनच झाल्याचे कळले, असे रंगराव यांनी सांगितले.

नागेश्वर अन्नदानासाठी परिचित
मृत नागेश्वर यांचे भाऊ गणेश घुसे (रा. श्रीकृष्णनगर) हे जिन्सी ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक असून त्यांचा पुतण्याही ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहे. नागेश्वर मागील अनेक वर्षांपासून घाटीत अन्नदान, रुग्णांना मदत करण्यासाठी जात होते. त्यामुळे तेथील अनेकांशी त्यांचा परिचय होता. अन्नदान व सेवेमुळे त्यांचा बहुतांश वेळ घाटीत जात होता. रविवारी मात्र वजीरने किरकोळ वादातून त्यांचा खून केल्याचे चौकशीतून समोर आले. न्यायालयाने आराेपीला ११ नाेव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...