आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी ध्वजारोहण ; वृक्षारोपण व संगोपन-संवर्धनासाठी संकल्प

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनात व कार्यकर्त्यांनी घराच्या छतावर ध्वज फडकावला. तसेच रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व संगोपन-संवर्धनासाठी संकल्प केला. जिल्हाध्यक्ष आमदार कैलास पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरीफोद्दीन, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण पाटील प्रधान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारीकार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. शहर-जिल्ह्यातील पक्षीय संख्याबळ लक्षणीय घटले आहे. मराठवाडा मतदारसंघाचे सतीश चव्हाण एकमेव आमदार आहेत. मनपात एकच नगरसेविका आहे. जि. प. सदस्य संख्या, नगर परिषदेतील संख्या नगण्य आहे. हे चित्र आगामी निवडणुकीत बदलण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी चिंतन केले. यामध्ये बदल करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...