आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी पक्षी अभयारण्य:पक्षिगणनेत फ्लेमिंगो आढळले नाहीत, मात्र पक्षिमित्रांच्या कॅमेऱ्यात कैद!

पैठण (रमेश शेळके)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वन्यजीव विभागाच्या टीमला गणनेत फ्लेमिंगो आढळून आले नाहीत

जायकवाडी पक्षी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पक्षी दरवर्षी लाखोंच्या संख्येने येतात. यंदाही मोठ्या प्रमाणात पक्षी आले. या पक्ष्यांची गणना नुकतीच वन्यजीव विभागाने केली. यात विविध जातींचे पक्षी आढळून आले असले तरी यात येथे लाखोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो आढळून आले नसल्याचा दावा वन्यजीव विभागाने केला अाहे. ही पक्षिगणना वन्यजीव विभागाने कार्यालयात बसून केली का, असा सवाल पैठणमधील पक्षी अभ्यासकांनी केला असून सध्याही जायकवाडी पक्षी अभयारण्यात मोठ्या संख्येने फ्लेमिंगो असल्याचे पक्षिमित्र सुनील पायघण व संतोष गव्हाणे यांनी सांगितले.

वन्यजीव विभागाच्या टीमला गणनेत फ्लेमिंगो आढळून आले नाहीत
दहा दिवसांपूर्वीच वन्यजीव विभागाच्या ६० कर्मचारी-अधिकारी यांच्या टीमने जायकवाडी पक्षी अभयारण्यातील दक्षिण व उत्तर विभागात पक्षी गणना केली. यात सत्तर हजार पक्षी आढळून आले असल्याचे वन्यजीव विभागाचे यू.डी. गाडगीळ यांनी सांगितले. मात्र आम्हाला यात फ्लेमिंगो आढळून आले नाही, असा दावा वन्यजीव विभाग केला असल्याने खरेच या टीमने अभयारण्याची पाहणी केली का, कोणती गणना केली, असा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात असलेले फ्लेमिंगो पाहता दिसत आहे.

वन्यजीव विभागाचे विभागीय अधिकारी विजय सातपुते, वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे, सहायक वनसंरक्षक एस.डी.पाटील, वन अधिकारी के.एम गिते, डी.यू. गाडगीळ, एस.के. थोरात या टीमने पक्षी गणना केली हाेती.

वन्यजीव विभागाच्या टीमने पक्षी गणना केली असता यात फ्लेमिंगो आढळून आले नाहीत. मात्र आता धरणावर फ्लेमिंगो येत आहेत अशी माहिती वन्यजीव विभागाचे यू.डी. गाडगीळ यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

फ्लेमिंगो दिसलेच नाही, पथकाची माहिती
दरवर्षी थंडीत लाखोंच्या संख्येने जायकवाडीवर देश- विदेशातील फ्लेमिंगो येतात. यात यंदा ते मोठ्या संख्येने आले नाहीत. मात्र काही प्रमाणात ते जायकवाडीच्या पक्षी अभयारण्यात आढळून येत असून सध्या बदलत्या हवामानामुळे उन्हाळ्यादरम्यान सध्या मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो आले असताना वन्यजीव विभागाने मात्र आपल्या पक्षिगणनेत फ्लेमिंगो दिसले नाही.

बातम्या आणखी आहेत...