आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान:खराब हवामानामुळे औरंगाबादवर घिरट्या घालून विमान मुंबईकडे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दुपारी ३ वाजेनंतर ढग दाटून आले. त्यानंतर साडेपाच वाजेच्या सुमारास जाेरदार पाऊस सुरू झाला. ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे वातावरणातील दृश्यमानता कमी झाल्याने चिकलठाणा विमानतळावर सायंकाळी ७.३० वाजता विमान उतरू शकले नाही. त्यामुळे ते मुंबईला परत गेले. तेथून रात्री ९ वाजता पुन्हा शहरात आले, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.

इंडिगाेचे मुंबईहून येणारे विमान सायंकाळी ७.३० वाजता चिकलठाणा विमानतळावर उतरणे अपेक्षित हाेते. पण याच वेळी शहरात जाेरदार पाऊस सुरू हाेता. धावपट्टीवरील दृश्यमानताही कमी झाली हाेती. त्यामुळे विमानाने काही वेळ हवेत घिरट्या मारल्या. मात्र, इंधन कमी हाेत असल्याने विमान पुन्हा मुंबईला गेले. रात्री ८ नंतर पावसाचा जाेर आेसरला. ढगांचे प्रमाण कमी झाल्याने अखेर मुंबई येथे इंधन भरून हे विमान रात्री ९ वाजता पुन्हा आैरंगाबादला आले. येथील प्रवाशांना घेऊन पुन्हा मुंबईकडे उड्डाण घेतले. वातावरणातील बदलामुळे अनेकदा असा प्रसंग उद््भवताे. अशा वेळी जवळच्या ठिकाणी विमान उतरवण्यात येते. प्रवाशांना त्याच कंपनीच्या विमानाने पुन्हा पाठवले जाते. यामुळे आर्थिक फटका बसत नाही असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...