आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Flood Situation In Nanded District Remain, Four Gates Of Yeldari Dam Closed; Discharge Of Water Continues Through The Six Gates Of Yeldari And 18 Gates Of Jayakwadi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलमय:नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती कायमच, येलदरी धरणाचे चार दरवाजे बंद; येलदरीच्या सहा दरवाजांतून तर जायकवाडीच्या 18 दरवाजांतून विसर्ग सुरूच

नांदेड / परभणी / हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोदावरीसह उपनद्यांनाही पूर, लाखो हेक्टरमधील पिके धोक्यात

गेल्या पाच दिवसांपासून मराठवाड्यात होत असलेला पाऊस, जायकवाडीसह माजलगाव धरणासह इतर बंधाऱ्यातून होत असलेल्या विसर्गामुळे गोदावरीचे पात्र फुगले असून खाली नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती आज सलग चौथ्या दिवशीही कायम होती. जायकवाडीतून ६६०२४ क्युसेकने गोदावरीत विसर्ग केला जात आहे. तर इसापूर धरणातूनही विसर्ग सुरूच असल्याने नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगेलाही पूर आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात एकट्या नांदेड जिल्ह्यातच सध्या अधिक प्रमाणात पूरस्थिती पहावयास मिळत आहे.

चार दिवसांनंतरही नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती जैसे थे आहे. प्रकल्पांतून पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरी आणि पैनगंगा या दोन मोठ्या नद्यांना आलेला पूर कायम आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गोदावरीलवरील विष्णुपुरी बंधाऱ्याचे १० दरवाजे रविवारी उघडण्यात आले. त्या दहाही दरवाजांतून मंगळवारी २९.७० क्युमेक विसर्ग सुरूच आहे. तर जायकवाडीच्या १८ दरवाजांमधून ६६ हजार ०२४ क्युसेक विसर्ग सुरू असल्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर कायम आहे. या शिवाय आमदुरा बंधाऱ्याचे १५, बळेगावचे १६ आणि बाभळीचे १४ दरवाजे उघडले आहेत. इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडण्यात आले असून ३६.७१ दलघमी पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे.

पिकांची वाताहत

सतत पडणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे नांदेड, देगलूर, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यांत शेतात पाणी शिरले आहे. शेतात पाणी साचल्याने कापणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाला कोंबे फुटली आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

हिंगोली जिल्ह्यात धुवाधार पाऊस, हिंगोली मंडळा ११४ मिमीची नोंद

हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी पहाटे धुवाधार पाऊस झाला. हिंगोली मंडळात ११३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. डिग्रस मंडळात ६८ मिलमीटर, कळमनुरी ९४, आखाडा बाळापूर ६५, नांदापूर ७४ तर औंढा मंडळात ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

खडकपूर्णामधून विसर्ग

येलदरी धरण १०० टक्के भरले असून मंगळवारी सकाळी ८०५.०४२ दशलक्ष घनमीटर जीवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. मंगळवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास धरणाच्या बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाचे ९ दरवाजे तीस सेंटीमीटरने उचलून दहा हजार ६८० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

पूर्णा नदीलाही पूर

येलदरी धरणाचे दहा दरवाजांपैकी चार दरवाजे मंगळवारी बंद केले . पूर्णा नदीपात्रात १५ हजार १५९ क्युसेक विसर्ग करण्यात येत होता. दोन दिवसांपासून उघडण्यात आलेल्या दरवाजांपैकी एक, तीन, पाच, सहा, आठ आणि दहा या क्रमांकाच्या या सहा दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सोमवारी दुपारी दीड मीटरपर्यंत दरवाजे उचलण्यात येऊन विद्युत निर्मितीसह ६३ हजारांपेक्षा जास्त क्युसेक विसर्ग सोडला होता. मंगळवारी चार दारे बंद करून १, ३, ५, ६, ८ व १० क्रमांकाच्या दरवाज्यातून १२६५९.८९ क्युसेक व विद्युतनिर्मिती प्रकल्पाद्वारे २ हजार ५०० क्युसेक विसर्ग नदीत होत आहे.

बातम्या आणखी आहेत...