आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामकरसंक्रांतीला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे बाजारपेठेत विविध प्रकारच्या पतंगांच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक पक्ष्यांचा जीव जातो, अनेक जखमीही होतात. त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नका, साध्या दोऱ्याने पतंग उडवा. त्यासाठी औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या अध्यक्षा बेरिल सांचिस यांच्यातर्फे मुकुंदवाडी ते एपीआय कॉर्नर येथे पोस्टर्स, बॅनरवर नायलॉन मांजा खरेदी करू नका, याबाबत जनजागृती व स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
डिसेंबर संपला की बाजारात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा खरेदी-विक्री केला जाताे. त्यामुळे पतंग उडवतातना अनेक पक्षी जखमी होतात. रात्री झाडांवर अडकलला पतंगांचा दोरा पक्ष्यांना दिसत नाही. परिणामी कबतूर, गव्हाणी घुबड, भारद्वाज, कोकीळ, पोपट, वटवाघूळ जखमी होतात. त्यावर उपाय म्हणून नायलॉन मांजा वापरू नका, त्यासाठी सामाजिक संस्थांसह पक्षिप्रेमीदेखील जनजागृती करीत आहेत.
संध्याकाळी पतंग उडवू नका सकाळी ८ वाजेपर्यंत पक्षी फिरतात आणि संध्याकाळी ५ वाजता आकाशातून घरट्याकडे परतात. त्यामुळे तरुणांनी या दोन वेळात पतंग उडवू नये, यासाठी शनिवार-रविवारी जनजागृती करणार आहे. -बेरिल सांचिस, अध्यक्षा, औरंगाबाद पेट लव्हर्स
पक्षी सर्वाधिक जखमी पतंगाचा दोरा झाडावर अडकतो. त्यामुळे रात्री सर्वाधिक पक्षी जखमी होऊन मरतात. यात कबूतर, कोकीळ, भारद्वाज आदी पक्षी आढळून येतात. त्यामुळे शक्यतो मांजा वापरू नका. -डॉ. किशोर पाठक, पक्षिप्रेमी
जखमी होण्याचे कॉल येतात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करतोय. आता आमच्याकडे दहा ते बारा जखमी पक्षी होण्याचे कॉल प्राप्त झाले आहेत. -किशोर गठडी, सचिव, निसर्ग मित्रमंडळ
बॅनर्सद्वारे जनजागृती करणार मांजामुळे या दिवसांत ३०-४० पक्षी जखमी होतात. त्यामुळे दुर्मीळ पक्षी होत आहेत. त्यासाठी साधा दोरा वापरा, यासाठी बॅनर लावून केले जाणार आहे. -रमेश राऊत, पक्षिप्रेमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.