आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाय बिग:फ्लाय बिग’चे हैदराबाद विमान तिसऱ्या दिवशी रद्द ; तांत्रिक कारणामुळे रद्द, आजचे उड्डाण घेणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लाय बिग कंपनीने १ जूनपासून हैदराबाद-औरंगाबाद विमानसेवा सुरू केली. त्याचे उद‌्घाटनही दणक्यात झाले. मात्र तिसऱ्याच दिवशी म्हणजे ३ जून रोजी हे विमान हैदराबादहूनच आले नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. सकाळच्या सत्रात हे विमान सुरू झाल्यामुळे त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दोन दिवसांत ६४ प्रवासी हैदराबादेतून औरंगाबादेत आले तर, ६६ प्रवाशांनी औरंगाबादेतून हैदराबाद गाठले. तांत्रिक कारणामुळे ३ जूनचे उड्डाण रद्द झाले असले तरी ४ जूनची दोन्ही उड्डाणे ठरलेल्या वेळेत होणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कंपनी नवी असल्याने सध्या त्यांच्याकडे पुरेसा स्टाफ नाही, त्यामुळे शुक्रवारचे विमान रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबादहून इंडिगो कंपनीचेही एक विमान दररोज हैदराबादला जाते. मात्र त्याची वेळ दुपारनंतर आहे. सकाळच्या सत्रात विमान असावे अशी प्रवाशांची आग्रही मागणी होती. त्यानुसार फ्लाय बिग कंपनीने ७८ प्रवासी क्षमता असलेले विमान १ जूनपासून सकाळच्या सत्रात सुरू केले. २ जूनला ४० प्रवासी आले आणि ३४ प्रवासी औरंगाबादहून गेले होते.

बातम्या आणखी आहेत...