आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या राजकीय क्षेत्रापेक्षा खेळात मोठे राजकारण:राजकारणाऐवजी खेळ व खेळाडूवर लक्ष द्या - अंबादास दानवेंचे प्रतिपादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काम करत आहे. परंतू कामानिमित्त राज्य भरात फिरत असताना खेळाशी जवळून संबध आला. तेव्हा कळाले की, राजकीय क्षेत्रापेक्षा क्रीडा क्षेत्रात आमच्या पेक्षा अधिक राजकारण केले जाते. ते ही आमच्या सारख्यांना जमणार नाही असे. खेळात राजकारण करण्यात पेक्षा खेळ व खेळाडूच्या विकासावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले.

उद्घाटनाप्रसंगी केले वक्तव्य

औरंगाबाद जिल्हा व तालुका बास्केटबॉल संघटना, महा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल पुरुष व महिला संघांच्या निवड चाचणी स्पर्धा व राष्ट्रीय स्पर्धेसाठी सराव शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार अंबादास दानवे बोलत होते. दानवे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा सचिव शत्रुघ्न गोखले, कोषाध्यक्ष जयंत देशमुख, एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कड, सचिव सचिन तक्तापुरे, उपाध्यक्षा बिजली आमरे व मंदा कड यांच्या प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इतर मान्यवरांचे स्वागत मंदा कड, प्रशांत बुरांडे, विजय पिंपळे यांनी केले.

दानवेंनी मारले मैदान

औपचारिक उद्घाटनदरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रिंगमध्ये बास्केटबॉल टाकून करण्यात आले. यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी पहिल्याच प्रयत्नात बॉल कौशल्याने रिंगमध्ये टाकून मैदान मारले. इतरांना दोन-तीन वेळा प्रयत्न करावे लागले.

200 खेळाडूंचा सहभाग,18 खेळाडू निवडणार

राज्य संघ निवड चाचणीसाठी राज्यातील एकूण 31 जिल्ह्यातील जवळपास 200 पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ही चाचणी 3 व 4 सप्टेंबर रोजी पार पडेल. यातून 18 सदस्यीय राज्य संघ निवडला जाईल. पुढील आठवड्यात भावनगर (गुजरात) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होईल. संघाचे शिबिर एमएसएम मैदानावर पार पडेल. औरंगाबादवरून संघ गुजरातला रवाना होईल, असे औरंगाबादचे अध्यक्ष गणेश कड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...