आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्पायरिंग:‘आज जे करत आहात त्यावरच लक्ष केंद्रित करा, हाच यशाचा राजमार्ग’

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणे दूरची गोष्ट, माझ्यासाठी भारतीय क्रिकेट संघात खेळणे हीच मोठी गोष्ट होती. वर्तमानात जगणाऱ्या लोकांपैकी मी एक आहे. मी जास्तीत जास्त उद्याबाबत विचार करतो. मात्र आजवरही माझे पूर्ण लक्ष असेल. मला आज काय करायचे आहे, यावर लक्ष केंद्रित करतो. शाळेसाठी खेळत असेन अथवा भारतीय संघातून, माझे पूर्ण लक्ष सामन्यावरच केंद्रित असेल. आज सामना जिंकायचा आहे, हाच विचार मी करतो. त्याचा काय फायदा होईल, हा विचार करणे माझे काम नाही.

मी गोष्टी साध्या, सरळ ठेवतो. आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी नेहमीच तयार असतो. मी देशासाठी खेळत असेन अथवा शाळेसाठी, आपण सर्वच जण पुढे जाऊ, असे काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न असतो. मी काय सहकार्य करू, कशी मदत करू, कशी योजना बनवू... त्यातून आपण पुढे जाऊन सर्वोत्तम बनू शकू. कोणत्याही करिअरमध्ये तुम्ही काम सुरू करता. त्या दिवसापासून अगदी निवृत्त होईपर्यंत फक्त हाच विचार करावा, की जाताना तुम्ही तुमच्या टीमला, सहकाऱ्यांना काय देऊन जात आहात?

तुमची संस्था, कंपनी सतत प्रकाशझोतात राहिली पाहिजे. जसा विचार मी देशासाठी करतो. मी किती धावा काढल्या, किती बळी घेतले, यावर माझे लक्ष असेल तर ते ठीक राहणार नाही. पूर्ण संघानेच चांगली कामगिरी करावी, यावर लक्ष असायला हवे. गोष्टी साध्या-सरळ ठेवा. आपला फायदा कशात आहे, यात गुंतून पडून नका. यश हे कोण्याही एकाचे नसते. पूर्ण संस्थेचे असते. ही गोष्ट जेवढ्या लवकर तुम्ही समजून घ्याल, तेवढे स्वत:ला सहज ठेऊ शकाल.

दुसऱ्यांहून काय वेगळे करू शकता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळी गोष्ट तुमच्यात असेलच. जबाबदारी घ्याल तेव्हा ही खासियत आणखी जास्त उजळून निघेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या संघाला वेगळे दिसू लागाल. जबाबदारी तुम्हाला खास बनवेल. तुम्ही स्वत:चा विचार करत नसाल, संघाला सोबत घेऊन चालत असाल तर हे वेगळेपणच लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेईल. तुम्ही तुमच्या एका खास स्थितीत पोहोचाल. लोकांचे कौतुक तुम्हाला खास बनवेल. (२०२० मध्ये मंदिरा बेदीशी एमएस धोनीने मनमोकळा संवाद साधला होता.)

फक्त कामावर लक्ष द्या, सर्व ठीक होईल माझ्यासाठी क्रिकेट सर्वस्व आहे, तुमच्यासाठी तुमचे काम केंद्रस्थानी हवे. मी केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले, बदल्यात क्रिकेटने माझ्या दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष दिले हा माझा अनुभव. तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा. काम चांगले होईल. त्यामुळे दुसरी चिंता करण्याची वेळच येणार नाही.

क्रिकेट आणि आयु्ष्य एकसारखे वाटते मला क्रिकेट नेहमीच जीवनासारखे वाटते. आज तुम्ही शतक ठोकले, उद्या शून्यावर बाद होऊ शकता. क्रिकेट तुम्हाला उडू देत नाही. आज पंख पसराल, उद्या जमिनीवर असाल. क्रिकेटमुळे तुम्ही नम्र होता. नम्रपणा जीवनात सर्वाधिक महत्त्वाचा. तुमच्यात नम्रपणा आला तर जीवन सहजसोपे होईल. लहान-लहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. कठोर मेहनत, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा... या गोष्टी नम्र बनवतील.