आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:कचनेर यात्रा महोत्सवात पाच दिवसांत 35 लाखांचे अन्नदान; सर्वधर्मीयांसाठी वर्षभर मोफत दवाखान्याला होणार सुरुवात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जैन बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन, कचनेर यात्रा ६ ते ९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. यामध्ये ७५ हजार भाविक सहभागी होणार असून ५ हजार भाविक पायी चालून येणार आहेत. पाच दिवसांच्या यात्रेत ३० ते ३५ लाखांचे अन्नदान होणार आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून सर्वधर्मीयांसाठी मोफत औषधालय कचनेरमध्ये सुरू करण्यात येत आहे, ज्यामध्ये सामान्य आजारांच्या औषधी मोफत दिल्या जातील, असे महामंत्री विनोद लोहाडे यांनी सांगितले.

बालयोगी आचार्य सौभाग्यसागर महाराज आणि त्यांच्या संघाच्या सान्निध्यात यात्रा उत्सव होईल. यात्रेत ६ नोव्हेंबरला सौभाग्यसागर यांचा ४२ वा जन्मजयंती महोत्सव तसेच ८ वा आचार्य पदारोहण सोहळा, पिछी परिवर्तन सोहळा होणार आहे. ८ नोव्हेंबरला मुख्य अभिषेक सोहळा हाेईल. यासोबतच संघस्त आर्यिका सौभाग्यमती माता व क्षुल्लक शुभलामसागर यांचा प्रथम दीक्षा समारोह होईल.यात्रेत जैनेतरांचाही लक्षणीय सहभाग असतो. यात्रेला भाविकांनी हजेरी लावावी असे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डी. यू. जैन, व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेशकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष संजयकुमार कासलीवाल, कार्यकारिणी अध्यक्ष ऋषभकुमार गंगवाल, महामंत्री विनोदकुमार लोहाडे यांनी केले आहे.

१. रविवार (६ नोव्हेंबर) : दुपारी १ वाजता सौभाग्यसागर महाराजांचा ४२ वा अवतरण दिवस, ८ वाजता आचार्य पदारोहण दिवस, पिछी परिवर्तन आणि दीक्षा समारोह होईल. यानंतर महाप्रसाद आणि सायंकाळी आरती होईल. २. सोमवार (७ नोव्हेंबर) सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण, बोलिया व पंचामृत महामस्तकाभिषेक, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, आरती व भक्ती संध्या होईल.

आजवर ४ हजार विद्यार्थ्यांना लाभ
२७ वर्षांपासून कचनेर मंदिराच्या माध्यमातून ६०० विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते दहावी शाळा, ५० मुलांसाठी गुरुकुल, १२० विद्यार्थ्यांसाठी छात्रालय चालवले जाते. यामध्ये ३ हजार ८९० विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. याशिवाय ९० खोल्यांची धर्मशाळाही चालवली जाते, ज्याचा लाभ जैनांसोबतच परिसरातील नागरिक घेतात.

३. मंगळवार (८ नाेव्हेंबर)
सकाळी १० वाजता मूलनायक श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक णमोकार भक्ती मंडळातर्फे होईल. महाप्रसादानंतर दुपारी ३ वाजता जलयात्रा, पालखी, रथयात्रा मिरवणूक निघेल. सायंकाळी ७ वाजता आरती, शास्त्र व स्वाध्याय झाल्यावर सर्वसाधारण सभेने सांगता होईल.
४. बुधवार (९ नोव्हेंबर)
सकाळी १० वाजता बोलिया व मूलनायक श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ भगवंतांचा पंचामृत महामस्तकाभिषेक, महाप्रसाद, आरती, शास्त्र व स्वाध्याय होईल.

बातम्या आणखी आहेत...