आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62 ​​​​​​​ वर्षांपासूनची अखंड परंपरा कायम:संस्थान गणपतीतर्फे 10 दिवस रोज 3000  भक्तांना अन्नदान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संस्थान गणपती मंडळाच्या माध्यमातून १९५० पासून गणेशोत्सवात अन्नदान केले जाते. पहिल्या वर्षी केवळ सहा जणांनी मिळून २५ जणांनाच अन्नदान केले. मात्र पाहता पाहता दरवर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढत गेली. आज ६२ व्या वर्षी उत्सवातही दररोज किमान तीन हजार म्हणजे दहा दिवसांत तब्बल ३० हजार लोक भोजनाचा आस्वाद घेतात. सुमारे ३२ वर्षांपासून इतक्या मोठ्या संख्येने लोकांना जेवू घालण्याचे पुण्यकर्म हे मंडळ करत आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे सचिव प्रफुल्ल मालाणी यांनी दिली.

रमेश घोडेले हे ज्येष्ठ कार्यकर्ते या पूर्णवेळ सक्रिय असतात. पहाटे चार वाजताच स्वयंपाकाची सुरुवात होते. २०० ते २५० स्वयंसेवकांची फळी १० राबते. २००७ पर्यंत अन्नदानात पुलाव आणि बुंदी दिली जात होती. पण, त्यानंतर पुरी-भाजीचाही समावेश करण्यात आला.घोडेले सांगत होते की, कोविडदरम्यान उत्सव साजरे करण्याला मर्यादा आल्या. पण, आमचा अन्नदानाचा महायज्ञ आम्ही थांबवला नाही. उलट आम्ही १० दिवस शहरातील वृद्धाश्रम, अनाथाश्रम, बालकाश्रम, अंधाश्रम अशा १२ ठिकाणी दररोज जेवण पोहोचवत होतो.

पहाटे चार वाजेपासून २१ जणांची टीम स्वयंपाकात
दहा दिवस बाबुराव महाराज २१ जणांच्या टीमच्या मदतीने तीन हजार लोकांचा स्वयंपाक करतात. १५ वर्षांपासून ते हे काम करतात. पहाटे ४ ते दुपारी २ वाजेपर्यंत संपूर्ण स्वयंपाक होतो. या मंदिरासमोर सकाळी अथर्वशीर्ष पठण केले जाते. यात पठणाला बसलेल्या ८०० ते ९०० भाविकांना दररोज सकाळी अल्पाेपाहार दिला जातो.

अन्नदानासाठी अनेक देणगीदारांचाही हातभार
२०१९ मध्ये एक व्यक्ती येऊन पंगतीत जेवली. नंतर ११ हजारांची देणगी दिली. असे कशामुळे केले, विचारल्यावर त्यांनी सांगितले. ‘मी अनेक वर्षांपूर्वी येथे राहायचो. येथील अन्नदानाविषयी माहिती होती. आता तर अखंड उपक्रम सुरू आहे हे पाहून आनंद झाला. गणरायाच्या कृपेने मी समृद्ध झालो,’ ही आठवण मालाणींनी सांगितली.

बातम्या आणखी आहेत...