आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीर्तन:अन्नदान वाया जात नाही : निवृत्ती महाराज इंदोरीकर

बजाजनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीने संपूर्ण विश्व हादरून गेले. या संकटाने अनेकांचे आई-वडील, भाऊ-बहीण, नातेवाईक हिरावून घेतले. आता चांगले काम करा, दानधर्म करा, इतरांना मदत करा, सप्ताहात केलेले अन्नदान वाया जात नाही, असा सल्ला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दिला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन पश्चिम मतदारसंघातील बजाजनगर येथे पार पडले. या वेळी ते बोलत होते.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे, अॅड. आशुतोष डंख, नगरसेवक सचिन खैरे, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, सागर शिंदे, बबन डिडोरे, आदींसह े भाविकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...