आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा,:पादुका पूजन, शोभायात्रा, महिलांनी खेळली पावली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा ..’चा जयघोष करत तसेच मराठमोळ्या पद्धतीने वारकरी, टाळकरींच्या भजनाने शोभायात्रेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दत्त जयंती उत्सव सप्ताहानिमित्त १ डिसेंबर रोजी शोभायात्रा काढण्यात आली. जागृत दत्त सेवा मंडळाच्या वतीने सिडको एन-७ येथील श्री दत्त मंदिरापासून सकाळी अकरा वाजता शोभायात्रा काढण्यात आली. मंदिरात माजी उपमहापौर संजय जोशी यांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. या वेळी गणेश नावंदर, विश्वनाथ स्वामी, सविता घोडके, राजू मिरकर, उमेश काळे, गणेश जोशी, उद्धव वझूरकर यांची उपस्थिती होती.

टाळ, मृदंग, महिला-पुरुषांच्या भजनी मंडळांनी वेधले लक्ष: माजी उपमहापौर संजय जोशी यांनी श्री दत्ताच्या १ किलो वजनांच्या पादुका घेऊन फुलांनी सजवलेल्या बैलगाडीच्या रथात ठेवल्या. भजनी मंडळातील महिला-पुरुषांनी टाळ-मृदंगाच्या आणि वीणाच्या गजरात पावली खेळली. महिलांनी आनंदाने फुगड्या खेळल्या. वारकरी, टाळकरी यांनी उड्या मारत ‘दिगंबरा दिगंबरा..श्रीपाद वल्लभ दिगंबरा..’चा जयघोष केला. सदरील शोभायात्रा दत्त मंदिरापासून सिडको एन-७ परिसरात काढून पुन्हा मंदिरात समारोप केला. भजन स्पर्धेत विविध ९ मंडळांनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...