आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप सक्षमपणे लढणार:25 वर्षांपासून सत्ताधारी, विरोधक शहरवासीयांना साधे पिण्याचे पाणी देऊ शकले नाही- - महादेव नाईक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सत्ताधारी व विरोधी पक्षांनी शहरवासीयांना साधे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देता आले नाही, मुलभूत प्रश्नच कायम आहेत. हिच मोठी शोकांतिका असून त्यांना चांगला पर्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक सक्षमपणे लढणार आहे. दिल्ली, पंजाबमध्ये जनतेने आपच्या विकास कामांवर विश्वास ठेवला. तसेच औरंगाबादकरकडूनही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून यातून परिवर्तन होईल, असा विश्वासही आपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक यांनी व्यक्त केला.

आपच्या संघटन कौशल्याचा आढावा घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकची रणनिती ठरवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज कुलस्वामिनी मंगल कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली.

गोव्याचे माजी मंत्री तथा आपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी नाईक यांनी दिल्लीत शैक्षणिक, वीज, पर्यटन, स्वच्छता, पाणी, आरोग्य, वाहतुक सेवा, उद्योग, व्यवसाय, रोजगार आदी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे दुसऱ्यांदा विधानसभेत केजरीवाल यांना बहुमताने पाठवण्यात आले. एवढच नव्हे तर पंजाब राज्यातील जनतेनेही विकासालाच मतदान केले.

महाराष्ट्र व औरंगाबादकरांनाही परिवर्तनासाठी 'आप'चा सक्षम पर्याय हवा आहे. त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीचे पूर्व नियोजन करत आहोत. मतदारांच्या घरोघरी जावून सत्ताधारी व विरोधकांचे अपयश सांगणार आहोत. तसेच आमचा विकासाचा जाहिरनामा सादर करून अाम्हाला मत का द्यावे, याबाबत अभियान राबवले जाणार असल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले.

मोर्चा ढोंगीपणा

सत्तेत असणाऱ्यांनी मोर्चे काढणे हा ढोंग पण असून त्याची किळस येते. २५ वर्षे सत्तेत असणारे सेना भाजपाचे नेते एका नव्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. मोर्चे काढण्याचा ह्यांना खरंच अधिकार आहे का? शहरातील शाळांची दुरावस्था असो कि मनपा ची रुग्णालये, सर्वांची वाताहात औरंगाबादकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे राज्य संयोजक रंगा राचुरे म्हणाले. यावेळी राज्य संघटन मंत्री विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, जिल्हाध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष रघुनाथ पाटील, श्रीकांत आचार्य, मराठवाडा सचिव अनिल ढवळे, सदाशिव पाटील, शेख उस्मान, मोहम्मद बशीर, डॉ. शिवाजी कान्हेरे, आशा सावळे, सुनील भालेराव, मेघा राईकवार, प्रशांत इंगळे, प्रवीण हिवाळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...