आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मुंबई-दिल्लीसाठी सात महिने सकाळच्या वेळेत विमान नाहीच

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादेतून 27 मार्च ते 29 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळीच उड्डाण

औरंगाबादेतून इंडिगोच्या उन्हाळी सत्रातील उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. २७ मार्च ते २९ ऑक्टोबरदरम्यान फक्त सायंकाळच्याच सत्रात ही उड्डाणे असतील. त्यात दिल्ली-औरंगाबाद-मुंबई आणि मुंबई-औरंगाबाद-दिल्ली असा त्रिकोण जोडण्यात आला आहे. चिकलठाणा विमानतळावरील धावपट्टीवर टॅक्सी टर्नचे काम सुरू आहे. ते सकाळी ७ ते ३ वाजेदरम्यान चालणार आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रातील उड्डाणे सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.

औरंगाबादेतून इंडिगोची सेवा दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी आहे. यापैकी मुंबईवरून आलेले विमान मुंबईलाच, तर दिल्लीहून आलेले विमान दिल्लीला परत जात असे. मात्र, नव्या सेवेत मुंबईहून आलेले विमान औरंगाबादेत येऊन दिल्लीकडे उड्डाण करेल, तर दिल्लीहून औरंगाबादेत आलेले विमान मुंबईला उड्डाण घेईल. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. हैदराबादला जाणाऱ्या विमानाची प्रवासी क्षमता ७८ आहे, तर ए-३२० हे दिल्ली-मुंबईदरम्यान सेवा देणारे विमान १८० प्रवासी क्षमतेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...