आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांपासून सा. बां.कडून छावणी उड्डाणपुलाचे काम सुरूच:नगरचा पूल 670 दिवसांतच पूर्ण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र  - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र 

दररोज किमान २० ते २५ हजार औरंगाबादकर पुण्याकडे येे-जा करतात. त्यांच्यासाठी छावणी येथील उड्डाणपुलाचे रुंदीकरण करण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी झाला. अजूनही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. येथील पुलाचे काम खंडपीठाच्या कठोर आदेशानंतर गती पकडत आहे. दुसरीकडे याच औरंगाबाद-पुणे रस्त्यावरील अहमदनगर येथील तीन किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम ६७० दिवसांतच पूर्ण होत आहे. २० नोव्हेंबर रोजी या पुलावरून औरंगाबादकरांना जाता येईल. त्यांचा पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी वाचू शकेल.

२०१० मध्ये सर्वात प्रथम छावणी उड्डाणपूल रुंदीकरणाचा विषय ऐरणीवर आला होता. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने पुलाचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात काम सुरू करण्यात प्रचंड दिरंगाई झाली. तांत्रिक मंजुरी, पुलाचा आराखडा आणि निधी मिळण्याच्या अनेक अडचणी उभ्या करण्यात आल्या. अखेर हा प्रश्न औरंगाबाद खंडपीठासमोर झाला. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्र व राज्य शासन तसेच रेल्वे मंत्रालयाला फटकारल्यावर कामाला नुकतीच गती मिळाली आहे. याच तुलनेत अहमदनगरचा पूल राष्ट्रीय महामार्गाच्या ६१० जणांच्या पथकानेे अवघ्या ६७० दिवसांत उभारला. या पुलाचे २ टक्के कामे शिल्लक असून, ती येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहेत. १९ नोव्हेंबरला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण होईल. मार्च २०१९ मध्ये तत्कालीन दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या कामाला डिसेंबर २०२० मध्ये सुरुवात झाली. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी गांधी यांच्यानंतर पाठपुरावा केला. या कामासाठी ३४० कोटी रुपये मंजूर झाले होते. प्रत्यक्षात २८९ कोटी रुपये प्राप्त झाले होते. २५८ कोटी २० लाख रुपयांत पूल उभारणी झाली.

बातम्या आणखी आहेत...